पुणे – सामाजीक सुरक्षा विभागाने जुगार अड्डयावर छापा टाकुन 11 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 19 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई येरवडा येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीत राजीव गांधी झोपडपट्टी येथील पत्र्याचे शेड मध्ये काही व्यक्ती मटका जुगार खेळत आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्राप्त झाली.
या ठिकाणी छापा टाकुन कारवाई करणेबाबत आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना दिले. त्यानूसार छापा टाकला असता किं रु 19,780 रोख रक्कम व जुगाराचे साहित्य सह माल जप्त करुन जुगार घेणारे व खेळणारे व जुगार चालविणारा मुळ मालक असे एकुन11 जणांना ताब्यात घेऊन येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.