नवी दिल्ली – इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा, चॅम्पियन्स लिगसारख्या युरोपात प्रसिद्ध असलेल्या या सर्व स्पर्धा किमान जुलै व ऑगस्टपासून तरी सुरु व्हाव्यात यासाठी युरोपियन फुटबॉल संघटनेने (यूएफ) प्रयत्न सुरु केले असून त्यापूर्वी सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
फुटबॉल लीगचा मोसम गरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरु होतो. यावेळी करोनाच्या धोक्यामुळे या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. जगभरातील स्पर्धा रद्द किंवा स्थगित होत आहेत, मात्र ही परिस्थिती कधी दूर होईल व स्पर्धा पुन्हा कधी सुरु करता येतील याबाबत सध्या संघटनेने प्रयत्न सुरु केले आहेत.
जुलैमध्ये जर या स्पर्धा सुरू करता आल्या तर पुढील वर्षाच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. तसेच करोनामुळे स्पर्धा थांबल्यामुळे संघटना व क्लबवर आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे या स्पर्धा लवकर सुरु होणे महत्वाचे आहे, असे संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.