पश्चिम बंगालमध्ये दीदीच – एबीपी सीव्होटरचे सर्वेक्षण

नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकपूर्व मतदान सर्वेक्षणाचा निकाल एबीपी सीव्होटरने शनिवारी जाहीर केला. त्यानुसार भाजपा आसाम राखण्यात यशस्वी ठरेल. मात्र, लक्षवेधी ठरणाऱ्या प. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आपली सत्ता कायम राखणार असली तरी तेथे भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे मानण्यात येत. केरळमध्ये डावे पक्ष सत्ता कायम राखतील तर तमिळनाडूत कॉंग्रेस द्रमुक आघाडी मोठा विजय मिळवेल.

प. बंगालमध्ये भजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार दिलीप घोष यांच्या तुलनेत ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता खूपच अधिक असल्याचे आढळून आले आहे. घोष यांना 24.6 टक्के समर्थन मिळाले आहे तर बॅनर्जी यांना 54.5 टक्के समर्थन मिळाले आहे. तृणमूल कॉंग्रेस हा 156 जागा पटकावेल. तर भाजपला 100 जागा मिळतील असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. तर कॉंग्रेस आणि डावे पक्ष यांना केवळ 35 जागांवर विजय मिळेल.

ममता बॅनर्जी यांच्या कराभारावर खूप समाधानी असल्याचे 37 टक्के मतदारांनी नमूद केले. तर समाधानी असल्याचे 34 टक्के मतदारांनी सांगितले. त्यांच्या कारभाराबाबत असमाधान 26 टक्के मतदारांनी व्यक्त केले. तर भाष्य करता येत नसल्याचे 3 टक्के जणांनी स्पष्ट केले.

केरळ
केरळमध्ये 140 जागांच्या विधानसभेत डाव्या पक्षांच्या आघाडीला घवघवीत यश मिळण्याचे भाकीत हे सर्वेक्षण करते. या आघाडीला 83 जागा ळितील असे अनुमान काढण्यात आले असून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 51 जागा मिळतील, असे अनुमान आहे. तर गेल्यावेळे प्रमाणे भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल तर एक अपक्ष विजयी होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

या राज्यात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिनरयी विजयन यांना मुख्यमंत्री पदासाठी 38.5 टक्के मतदारांनी पसंती दिली अहे. तर कॉंग्रेसच्या ओमेन चंडी यांना 27.0 जणांनी पसंती दिली होती.
विद्यमान राज्य सरकारच्या कारभारावर 45.35 टक्के जण खूप समाधानी आहेत. तर समाधानी असणाऱ्यांचे प्रमाण 42.87 टक्के असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रमुख पक्षांच्या आघाडीत खरी लढत होणार आहे त्यात द्रमुक आणि कॉंग्रेसच्या आघाडीला 158 जागा मिळतील. अण्णा द्रमुक आणि भाजपाच्या आघाडीला 62 जागा मिळवेल, असे अनुमान आहे. तर देशाचे लक्ष असणाऱ्या कमल हसन यांचा पक्ष एमएनएमला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागेल.

येथे सात अपक्षांना येथे विजय मिळेल. मुख्यमंत्रिपदासाठी ई के पलानीस्वामी (अण्णाद्रमुक) यांना 32.1 टक्के जणअंनी समाधान व्यक्त केले आहे. तर एम के स्टॅलिन (द्रमुक) यांना 39.4 टक्के मतदारांनी पाठींबा व्यक्त केल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.