‘वॉर’ चित्रपटातील गाण्यावर डॉक्टरांनी केला भन्नाट डान्स; काही तासात लाखो व्ह्यूज

नवी दिल्ली – देशावर कोरोना महासाथीचे संकट आहे. बाधित रुग्ण रुग्णालयात असताना घाबरलेले असतात. त्यांच्यावर योग्य उपचार करणे, त्यांना दिलासा देणे, त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे कार्य डॉक्टर करत असतात. यावेळी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आसाम राज्यातील कोरोना रुग्नसेवेत असलेले डॉ. अरुप सेनापती (ईएन टी सर्जन) यांनी वॉर चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

त्यांनी वॉर चित्रपटातील ‘क्यूँ लमहें खराब करे, आ गलती बेहिसाब करे’ या गाण्यावर डान्स केला आहे. काही तासातच 7 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. नेटकर्यांनीही त्यांचे कौतूक केले आहे. हा व्हिडीओ त्यांचे सहकारी डॉ. सैय्यद फैजन अहमद यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

‘आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेजमधील माझे कोविड रुग्णसेवेतील सहकारी डॉ. अरुप सेनापती ईएनटी सर्जन यांना भेटा. त्यांनी कोविड रूग्णांना आनंद वाटण्यासाठी डान्स केला आहे.’ असे ट्विट करून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

वाॅर चित्रपटात या गाण्यावर अभिनेता ऋतीक रोशनने डान्स केला आहे. डाॅक्टरांनी केलेला डान्स ऋतीकला खुपच आवडला असून त्याने तो व्हि़डीओ शेअर देखील केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरचा देखील असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसेच कोरोना बाधित झालेली मोठी बहीण उपचार घेऊन रुग्णालयातून परतल्यावर साऊंड च्या आवाजावर भररस्त्यात एका युतनीने डान्स केल्याचा व्हिडीओ ही व्हायरल झाला होता.

सध्या दिलासादायक बाब म्हणजे भारतातील कोरोनाबधितांचे प्रमाण हे कमी होत चालले आहे. तर, उपचार घेऊन घरी परातणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मृत्युदरही कमी आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.