fbpx

आणखी एका निकालाबाबत ट्रम्प यांची याचिका फेटाळली

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत पेन्सिलव्हीनीया प्रांतातील निकालाबाबत जी याचिका सादर केली होती ती फेटाळण्यात आली आहे. तेथे टपालाने आलेल्या लक्षावधी मतपत्रिका विचारात घेण्यास ट्रम्प यांनी या याचिकेद्वारे आक्षेप घेतला होता.

पण त्यासाठी कोणतेही सबळ कारण त्यांनी दिले नाही हे सिद्ध होत असल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात येत आहे असे तेथील कोर्टाने आज स्पष्ट केले. ट्रम्प यांनी यात गैरप्रकार झाल्याचा कोणताहीं पुरावा दिला नाही, तसेच त्यांनी या संबंधात जो दावा केला आहे त्यात कोणतेही तथ्य आढळून आले नाही असा स्पष्ट अभिप्राय कोर्टाने दिला आहे.

ट्रम्प यांनी अध्यक्षीय निकाल लांबवण्यासाठी न्यायालयीन लढाईचे अस्त्र उगारले असले तरी त्यांना कोठेच अनुकुल प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तरीही त्यांनी अजून निकालाला मान्यताच न देण्याचे धोरण ठेवल्याने त्यांची अमेरिकेत आता थट्टा होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.