मुंबई – करोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खेळाडूंच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचसाठी बीसीसीआयने आयपीएलदेखील 29 मार्चएवजी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, यामुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह आणखी चार क्रिकेटपटूंचे पुनरागमन संकटात सापडले आहे.
धोनी याच्यासह कुणाल पंड्या, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन व सुरेश रैना हे संघात पुनरागमनासाठी सज्ज झाले होते, मात्र, आता आयपीएल होणार का नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली जाईल किंवा यंदाची पूर्ण स्पर्धाच रद्द होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.