मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याबाबतची माहिती फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील सर्व नेते त्यांना काळजी घेण्याचे मेसेज करत आहेत. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना सदिच्छा दिल्या आहेत. “देवेंद्रजी तुम्ही खरे योद्धा आहेत, राज्याच्या हितासाठी तुम्हा सतत झटत असता त्यामुळेच राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही कोरोनाला हरवून लवकर बरे व्हाल आणि पुन्हा जनसेवेत रूजू व्हाल याची मला खात्री आहे,” असे ट्विट विखे पाटील यांनी केले आहे.
देवेंद्रजी तुम्ही खरे योद्धा आहेत, राज्याच्या हितासाठी तुम्ही सतत झटत असता त्यामुळेच राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही कोरोनाला हरवून लवकर बरे व्हाल आणि पुन्हा जनसेवेत रुजू व्हाल याची मला खात्री आहे. @Dev_Fadnavis
— Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) (@RVikhePatil) October 24, 2020
“लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.” असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बिहार दौऱ्यावर होते. तसेच महाराष्ट्रात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देखील त्यांनी मराठवाड्यात पाहणी दौरा केला होता.