दिल्लीत करोना आटोक्‍यात; गेल्या 7 महिन्यात पहिल्यांदाच नवीन करोनाबाधितांची संख्या…

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत करोना बऱ्यापैकी आटोक्‍यात आला असल्याचे आकडेवारीतून निष्पन्न होत आहे. शनिवारी दिल्लीत करोनाचे 494 नवीन रूग्ण आढळून आले. करोनाचे रूग्ण पाचशेच्या आत जाण्याची गेल्या सात महिन्यातील ही पहिलीच वेळ आहे.

आजच्या या नवीन रूग्ण संख्येचा विचार केल्यास दिल्लीत आत्तापर्यंत एकूण 6 लाख 26 हजार जणांना या रोगाची लागण झाली असून करोनामुळे एकूण 10 हजार 561 रूग्ण मरण पावले आहेत.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्विटरवर नमूद केले केली की गेल्या 11 दिवसांपासून करोनाची लागण होण्याचे प्रमाण 1 टक्‍क्‍यांपेक्षा खाली आले आहे. सध्या दिल्लीत केवळ 5342 सक्रिय बाधित आहेत. गेल्या नोव्हंबर महिन्यात 13 तारखेला सक्रिय बाधितांची संख्या तब्बल 44 हजार 456 इतकी होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.