‘तो’ निर्णय चुकल्याची खंत – विलियम्सन

वेलिंग्टन – भारताविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पंचानी रॉस टेलरला पायचीत बाद दिल्यावर मी त्यांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागायला हवी होती. कारण, रिप्ले पाहिल्यानंतर मला जाणवले की टेलर चुकीच्या निर्णायाचा बळी ठरला आहे. परंतु, संधी असताना मी डीआरएस घेतला नाही आणि अखेर आम्ही सामना 35 धावांनी गमावला. त्यामुळे डीआरएस न घेतल्याची खंत आहे. असे वक्त्‌यव्य न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने केले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 252 धावा उभारत न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचे लक्ष्य दिले होते. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला11 व्या षटकात रॉस टेलरबाद झाल्याने मोठा धक्का बसला आणि त्यांची अवस्था 3 बाद 38 अशी झाली. परंतु, नंतर समजले की हार्दिक पांड्याच्या गोलदाजीवर पायचीत झालेल्या टेलरला पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माघारी जावे लागले होते. त्यावेळी केन विलियम्सन दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत होता. त्याला पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत डीआरएसची मागणी करण्याची संधी होती. परंतु, त्याने दाद मागितली नाही.

सामना गमावल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विलियम्सन म्हणाला, मी बाद झाल्यावर जेव्हा माघारी गेलो. त्यानंतर काही मिनिटातच मला समजले की टेलर बाद नव्हता. जेव्हा त्याला पायचीत दिले गेले तेव्हा आम्ही डीआरएस घ्यावा की नाही याची चर्चा केले होती. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला होता की, चेंडू थोडा उंच लगल्याचे जाणवत आहे तुला काय वाटते? तेव्हा मी पूर्ण विश्वासपूर्वक काहीच सांगू शकलो नाही.

कधी चेंडू थडा उंच असेल असे वाटत होते तर कधी पंचांचा निर्णय योग्य वाटत होता. त्यानंतर, आम्ही डीआरएस घेतला नाही. चर्चा करूनही चुकीचा निर्णय घेतल्यामुळे मी जास्त दुखावलो गेले आहे. टेलर खुपच चांगली फलंदाजी करत होता. तो खेळपट्टीवर थोडा वेळ अजून टिकला असता तर सामन्याचा निकाल कदाचित आमच्या बाजूने लागला असता, असेही विलियम्सन म्हणाला.

मालिका पराभवाची कारण मिमांसा करताना विलियम्सन म्हणाला की, भारतीय संघाने संपूर्ण मालिकेत दबावाच्यावेळी चांगली कामगिरी केली. तर आम्ही दबावात खचलो. भारतीयांनी मोक्‍याच्यावेळी खेळ उंचावत बळी मिळवले आणि धावाही केल्या. अखेरच्या दोन सामन्यात आमच्या गोलंदाजांनी खेळ उंचावला पण संपूर्ण मालिकेचा विचार केला तर भारतीयांनी सरस खेळ केला, असेही तो म्हणाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)