कोविशिल्डचे दोन डोस अगोदरच घेतलेल्यांना काळजी नको

नवी दिल्ली, दि. 15- कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा एकदा वाढविण्यात आले आहे. आता दोन्ही डोस दरम्यान 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन डोसमधील अंतर वाढल्यामुळे ही लस अधिक प्रभावी होईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दोन डोसमधील अंतर वाढविल्यानंतर ज्यांनी दोन आधीच घेतले आहेत त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र ज्यांनी अगोदरच कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही, असे कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी म्हटले आहे.

अरोरा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की सरकार 24 तास लसी घेत असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये ऍस्ट्राजेनका लस दिली जात आहे आणि नवीन डेटा आणि माहितीच्या आधारे आम्ही निर्णय घेत आहोत.

गेल्या आठवड्यात आम्हाला युकेकडून नवीन डेटा मिळाला आहे, ज्याच्या आधारे नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली आहेत. त्यामुळे आता या दोन्ही डोसमध्ये 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण अंतर वाढल्यामुळे लसीचा परिणामही वाढत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.