नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 10,093 नवीन करोना रूग्णांची भर पडली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या 57,542 वर गेली आहे.गेल्या 24 तासांत 23 रूग्णांचे मृत्यू झाले असून त्यामुळे एकूण करोना मृतांची संख्या 5,31,114 वर पोहोचली आहे.
दिल्लीत पाच मृत्यूची नोंद झाली, तर छत्तीसगड आणि राजस्थानमधील प्रत्येकी तीन, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन, हरियाणा, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एक आणि केरळमध्ये चार जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. या नवीन दहा हजार 93 प्रकरणांमुळे देशातील कोविड रूग्णांची संख्या 4.47 कोटींवर गेली आहे. या आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 4,42,29,459 वर पोहोचली आहे.