नवी दिल्ली – देशात करोनाग्रस्तांची संख्या आज आणखी घटली असून गेल्या 24 तासांत संपुर्ण देशात करोनाचे 80 हजार 834 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे पॉझिटीव्हीटीचा दर आणखी घटून तो आता 4.25 टक्के इतका झाला आहे. मात्र करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या मात्र घटताना दिसत नाही.
गेल्या 24 तासांत देशात करोनामुळे 3 हजार 303 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता 3 लाख 70 हजार 384 इतकी झाली आहे. करोनाच्या सक्रिय बाधितांची संख्या आता 10 लाख 26 हजार 159 इतकी झाली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी येट 95.26 टक्के इतका झाला आहे.
करोनाच्या संबंधातील अन्य निकषांची आकडेवारी पहाता ही दुसरी लाट आता पुर्ण ओसरण्याच्या टप्प्यात आली आहे असे मानले जाते.