नगर – जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बाधित बरा होण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात आणखी एक नवीन कोरोना बाधित संशयित सापडला आहे. नेवासा तालुक्यातील हा बाधित असून त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाने पथक नियुक्त केले आहे. हा आठवडा अटीतटीचा असून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत 63 कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यातील 58 अहवाल जिल्हा प्रशासनाला मिळाले आहेत. त्यात 56 निगेटिव्ह असून दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. तसेच या रुग्णाला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
तसेच सोशल मिडियावर खोटी माहिती पसरविणाऱ्यावर तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.