जाणून घ्या आज दिवसभरातील राज्यातील करोना रूग्णांची संख्या; किती मृत्यू, किती बाधीत

मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 752 नवे करोनाबाधित आढळले असून, 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1 हजार 743 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 20 लाख 9 हजार 106 वर पोहचली आहे. राज्यातील ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्या 44 हजार 831 असून, 19 लाख 12 हजार 264 जण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तर, 50 हजार 785 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, करोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवकांशी संवाद साधताना स्पष्ट केलेले आहे. लशीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आवाहन देखील केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.