दिलासादायक ! सलग 14 दिवस बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक

नवी दिल्ली – करोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून शुक्रवारी 62 हजार नव्या बाधितांची नोंद झाली. ही गेल्या चार दिवसांतील सर्वात निचांकी संख्या आहे. तर देशांत 70 हजारपेक्षा अधिक जण करोनामुक्त झाले आहेत. सलग 14 दिवस नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

सक्रिय बाधितांची सर्वाधिक संख्या 17 सप्टेंबरला नोंदवण्यात आली. त्यानंतर त्यात नियमितपणे घसरण सुरू झाली. गेल्या महिनाभरात दोन लाख 25 हजार सक्रिय बाधितांची संख्या कमी झाली. ही संख्या सक्रिय बाधितांच्या संख्येत 13 टक्के घट दर्शवते. करोनाच्या सक्रिय बाधितांमध्ये झालेली घट महाराष्ट्रात लक्षवेधी आहे.

देशाच्या एकूण घटीच्या निम्मी संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सक्रिय बाधित संख्या या काळात तीन लाखांवरून 1.9 लाखांपर्यंत कमी झाली आहे.

या शिवाय ही साथ आटोक्‍यात येत असल्याच्या अनेक निदर्शक घटना घडत आहे. वाढीचा दर एक टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाला आहे. तो आतापर्यंतचा सर्वात निचांकी आहे. याशिवाय केलेल्या चाचण्यामध्ये बाधित सापडण्याचा दर आठ टक्‍क्‍यांवर आला आहे. हे प्रमाण जुलैच्या मध्यावर होते. बाधितांच्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण 1.52 टक्के झाले आहे. तर बाधित बरे होण्याचा वेग 90 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.