देशात नवीन करोना रूग्ण वाढीत महाराष्ट्र सर्वात पुढे; पाहा आकडेवारी

नवी दिल्ली – महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे.

देशात गेल्या 24 तासात 16,738 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 8,807, केरळ मध्ये 4,106 तर पंजाब मध्ये 558 नव्या रुग्णांची नोंद झाली.

केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्‍मीर (केंद्रशासित प्रदेश) मध्ये केंद्र सरकारने उच्च स्तरीय पथके तैनात केली असून ही पथके या राज्यांमध्ये कोविडच्या वाढत्या रुग्णांची कारणे शोधून कोविड -19 नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य आरोग्य विभागाला सहाय्य करणार आहेत.

करोनातून बरे झालेल्यांची भारतातली एकूण संख्या आज 1,07,38,501 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 97.21 टक्के आहे. गेल्या 24 तासात 11,799 जण करोनातून बरे झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.