पुणे: कॉंग्रेसला पुन्हा घराघरात पोहचविणार; शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा विश्‍वास

पुणे – कॉंग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. तसेच कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्या वर्गाला पुन्हा कॉंग्रेस सोबत जोडण्यासाठी आगामी महापालिका निवडणूकीत कॉंग्रेस घरोघरी पोहचविणार असून नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा योग्य मेळ साधत पुन्हा कॉंग्रेस महापालिकेत सत्तेवर येईल असा विश्‍वास माजी गृहराज्यमंत्री आणि शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केला. शहराध्यक्ष बागवे यांनी शनिवारी दैनिक प्रभातच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते.

बागवे म्हणाले की, तळागळातील कार्यकर्ता ही कॉंग्रेसची खरी ताकद आहे. तसेच कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग पुणे शहरात आहे. त्याची नाळ मधल्या काही काळात तुटली आहे. ही नाळ पुन्हा जोडण्यासाठी पक्षाकडून संघटनात्मक बांधणी तसेच नियोजबध्द काम केले जात आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात बुथ पासूनच कामाला सुरूवार करण्यात आली असून ब्लॉक़ अध्यक्ष, सेल अध्यक्ष तसेच वेगवेगळया विंगच्या अध्यक्षांसह आजी- माजी नगरसेवकांना जोडून देत घरोघरी जाऊन पक्ष पुन्हा घराघरात पोहचविण्याचे काम सुरू आहे. त्या, युवा मतदारांसमोर तसेच पुणेकरांसोबत सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेली चूकीची कामे जनते समोर आणत आहोत. पुढच्या टप्प्यात प्रभाग निहाय बैठका घेऊन ही मोहीम आणखी व्यापक करण्यावर पक्षाचा भर आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आगामी महापालिका चांगले यश मिळेल.

युवा वर्गाला देणार संधी
महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी सांगतील त्या सूचनेनुसार, काम होईल. मात्र, तूर्तास कॉंग्रेसची भूमिका स्वबळाची असून त्या प्रमाणे तसेच आघाडी झाली तर काय त्या अनुषंगाने कॅंग्रेसची निवडणूकीची तयारी पूर्ण असल्याचा दावा बागवे यांनी केला आहे. या शिवाय, गेल्या काही वर्षात युवा वर्ग पक्षाकडे मोठया प्रमाणात आकर्षित झाला असून जास्तीत जास्त युवकांना पक्षाकडून संधी दिली जाईल तसेच शहरातील झोपडपट्टयांमध्ये अनेक चळवळीतील युवक पुढे येत असून त्यांनाही पक्षाकडून ताकद देऊन या महापालिका निवड्‌णूकीत संधी देण्यात येणार असल्याचे बागवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जुन्या नव्यांचा समतोल साधत पक्ष महापालिकेत सत्तेवर येईल असा आपल्या विश्‍वास असल्याचे बागवे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.