पुणे – विश्रांतवाडीतील कॉंग्रेस पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. विकास शिवाजी टिंगरे (वय 49 , रा. पोरवाल रस्ता, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. विकास टिंगरे विश्रांतवाडी ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत.
टिंगरे यांनी पोरवाल रस्त्यावरील एका पतसंस्थेच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहितीची मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टिंगरे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.