नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचा आजचा मुक्काम हा मालेगावात असणार आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव प्रशासनाने शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करून चकाचक केले आहेत. तसेच मनपा दालनाची देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे.
मालेगाव तालुक्यात मुख्यमंत्र्यांचे विविध ठिकाणी कार्यक्रम आहेत, जाहीर सभा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रस्ते, मनपा कार्यालय, इतर महत्वाची ठिकाणे दुरुस्त करुन चकाचक केली आहेत. मालेगावात गिरणा विश्रांती गृहात मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असणार आहे.