नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधातील निदर्शनेही ईडीच्या ‘रडारवर’

अवैध निधीबाबतच्या चौकशीला देणार वेग

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात झालेली निदर्शनेही सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आहेत. त्या निदर्शनांची तीव्रता वाढवण्यासाठी अवैध निधीचा वापर झाल्याचा आरोप आहे. त्यावरून मनी लॉण्डरिंगच्या चौकशीला वेग देण्याच्या तयारीत ईडी आहे.

देशात काविरोधी निदर्शने सुरू होण्याआधी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी संबंधित बॅंक खात्यांमध्ये 1 कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे. त्या संघटनेच्या बॅंक खात्यांशी निगडीत 120 कोटी रूपयांची रक्कम ईडीच्या छाननीखाली असल्याचे सांगितले जात आहे.

पीएफआयचे पदाधिकारी आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यातील काही संभाषणे ईडीच्या हाती आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

पीएफआय आणि भीम आर्मीत कुठले आर्थिक लागेबांधे आहेत का यादृष्टीने तपास होऊ शकतो. पीएफआयने याआधीच बऱ्याचवेळा मोठ्या रकमेच्या व्यवहारांबाबतचे आरोप फेटाळले आहेत. कोट्यवधी रूपयांच्या व्यवहारांचे आरोप सिद्ध करण्याचे आव्हानही त्या संघटनेकडून देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.