केंद्र सरकार खरेदीत पारदर्शकता आणणार

नवी दिल्ली – केंद्र सरकार आपली खरेदी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी केंद्र सरकारने गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेस यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

ही यंत्रणा 2018-19 पासून कार्यरत असून सध्या या यंत्रणेच्या माध्यमातून 17,325 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे जी की 2016-17 मध्ये केवळ 422 कोटी रुपयांची होती. आगामी काळात या यंत्रणेच्या माध्यमातून 50 हजार कोटी रुपयांची खरेदी करण्याचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

9 ऑगस्ट 2016 रोजी हे पोर्टल सुरू केले होते. सरकारी कार्यालये, मंत्रालये आणि इतर सरकारी संस्थांना जी सामग्री लागते ती या पोर्टलच्या माध्यमातून खरेदी केली जात आहे. त्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शकपणे होण्यास मदत झाली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.या पोर्टलवरून दोन लाख विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे व आठ लाख उत्पादने उपलब्ध केली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.