बीएसएनएल सावरण्यासाठी विविध पर्यायांवर विचार

नवी दिल्ली – सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल कंपनी यातून सावरण्यासाठी नवनवीन योजना राबविताना दिसत आहे. त्यासाठी कंपनी येणाऱ्या काळात सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वयात निश्‍चित काळाच्या अगोदर घट करणार असल्याची मंडळाने घोषणा केलेली आहे. निश्‍चित वयापेक्षा निवृत्तीचे वय कमी करत 58 वर्ष करण्यात आले आहे. तर 54 हजार कर्मचारी कमी करणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.

सरकारकडून एका मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे की जी संकटातून कंपनीला सावरण्यासाठी नवीन उपाय योजना तयार करेल. यात एकूण सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामधील तीनच प्रस्ताव बीएसएनएलने मान्य केले आहेत. सरकारचे काही प्रकल्प बंद पडले असून त्यामध्ये जवळपास 2 हजार 900 कोटी रुपये यात अडकून पडले आहेत ते मिळविण्यासाठी बीएसएनएलला प्रयत्न करावे लागणार आहेत. ती रक्कम अंदाजे एप्रिल ते मे या कालावधीत मिळण्याची शक्‍यता आहे.500 कोटीची रक्कम बीएसएनएलच्या अन्य मार्गातून मिळण्याचा अंदाज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.