पुणे- नागपूर येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या शालेय राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या देवेन आरु याने 50-52 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर देवेनची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा दि. 8 जून ते 12 जून दरम्यान ओडिसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
देवेन आरु हा सध्या केंद्रीय विद्यालय (आर्मी एरिया, पुणे) या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात आहे. तो सध्या मुष्टियोद्धाचा सराव एमआयजीएस बॉक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षक उमेश जगदाळे, जयदिप निलवर्ण, संजीव गोडसे, शरद कंक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तसेच यापूर्वीही देवेन याने राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे.