धुळे – भाजपाचे जळगाव जिल्ह्यातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपाला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. आज धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यंकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर वरून दिली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच मिरा-भाइंदर विधानसभा मतदरसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रेवश केला आहे. तर आज धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या घटनांवरून भाजपला गळती लागल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. @Jayant_R_Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. pic.twitter.com/IuFbuz5OA0
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 28, 2020
जळगावात भाजप कोअर कमिटीची बैठक-
खडसे यांच्या पक्षांतरानंतर काल जळगाव येथे भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आदींची उपस्थीती होती.
कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. मात्र, या बैठकीला एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे उपस्थित नव्हत्या.