महाराष्ट्रातून मला 45 जागा जिंकून द्या – अमित शहा

पुणे – अयोध्येत राम मंदिर बनवणार असून भाजपा त्यासाठी कटिबध्द आहे, पण या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार आणि काॅंग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करावी असे म्हणत, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली.

ते पुणे येथे आयोजित भाजपाच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता भाजपच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. त्याप्रमाणे आगामी निवडणुकीत भाजपसोबत राहुन 45 जागा मला जिंकून द्या, अस आवाहन त्यांनी यावेळी केलं.

आम्ही मतांच राजकारण करत नाही. आपल्या सर्वाची ओळख ही भाजपचे एक कार्यकर्ता अशी आहे. भाजप पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा पक्ष नाही. 2019 मध्ये मोदी यांचच सरकार बनणार. आम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कामरूप पासून ते कच्छ पर्यंत एक एक घुसखोरांना शोधून शोधून बाहेर काढू, असं शहा यावेळी म्हणाले.

काँग्रेसनी दहा वर्षात एकदा 53 हजार कोटी शेतकऱ्यांच कर्ज माफ केलं. आम्ही 75 हजार कोटी दरवर्षी शेतकऱ्यांना देतोय. राहुल गांधींनी काय केलं अस म्हणत त्यांनी शेतकऱ्यांसाठी भाजप सरकारनं काय दिलं ते सांगितलं.

देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी केली जात आहे, त्यास त्यांनी ठग युती म्हटले आहे. तसेच महाआघाडी सत्तेवर आल्यास देश कित्येक वर्ष मागे जाईल असे म्हणत त्यांनी महाआघाडीवर टिका केली आहे.

यावेळी अमित शहा यांनी गेल्या ५ वर्षाचा विकासाचा आराखडा सर्व शक्तिकेंद्रप्रमुख आणि सर्व बूथप्रमुख समोर सादर केला आणि येणाऱ्या काळात सर्वांनी आणखी सक्षमपणे २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाला बहुमताने विजय करावं असं आवाहन केलं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)