भाजपाकडून निवडणुकांची जोरदार तयारी

पणजी -भाजपाकडून मेरा परिवार भाजप परिवार हा कार्यक्रम 12 फेब्रुवारीला सुरू होणार असून 2 मार्चपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाद्वारे सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचे झेंडे लावले जातील. तसेच स्टीकर्स लावण्यात येतील. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने गती दिली असून मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून 9 फेब्रुवारी रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेला भाजपचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत असे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

26 फेब्रुवारी रोजी कमल ज्योती संकल्प उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थीच्या घरी जाऊन ज्योत पेटविण्यात येणार आहे. 2 मार्च रोजी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघातून सुमारे 300 ते 400 मोटरसायकल या रॅलीत सहभागी होतील.

सुमारे पंधरा ते सोळा हजार मोटरसायकलचा या रॅलीत सहभाग असेल. 2019 मध्ये नवा भारत घडविण्यासाठी भाजपला कौल द्यावा, असे आवाहन करणारा राजकीय ठराव केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)