बारामती – बारामती शहर व तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. काही ठोस पावले उचलत प्रशासनाने बारामती शहरात निर्बंध लागू केले आहेत.
सकाळी नऊ ते रात्री सात पर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्याबरोबरच शहरात मॉर्निंग वॉक तसेच इविनिंग वॉकाला बाहेर पडून गर्दी करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध मोडणार यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारामती शहरामध्ये उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेतच व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
यामुळे पुढील आदेश येईपर्यंत मॉर्निंग वॉक व इव्हीनिंग वॉक तसेच सायकलिंग हे देखील प्रतिबंधित असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकला किंवा सायकलींगसाठी बाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. या काळात मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक किंवा सायकलिंग करताना कोणी आढळल्यास त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.