जोकोविच आणि नदाल यांच्यात रंगणार अंतिम लढत

मेलबर्न -जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचने उपान्त्यफेरीत लुकास पयलेचा 6-0, 6-2, 6-2 असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तेथे त्याचा सामना क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या राफेल नदालशी होणार आहे.

जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा साहा वेळी जिंकली आहे तर नादालने पाच वेळा अंतिम फेरी गाठताना एकवेळा हे ग्रॅंडस्लॅम जिंकले आहे. कारकिर्दीत प्रथमच जोकोविच विरुद्ध सामना खेळणाऱ्या लुकसला पहिल्या सेटमध्ये एकदाही त्याची सर्व्हिस ब्रेक करता आली नाही तर जोकोविचने त्याची सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी न सोडता पहिला सेट 6-0 असा जिंकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या सेटमध्येही जोकोविचने चांगला खेळ केला आणि दुसरा सेट 6-2 आसा जिंकला. अंतिम सेटही 6-2 असा जिंकत जोकोविचने लुकासला पुनरगमन करण्याची संधी दिली नाही आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविचने 2008, 2011, 2012, 2013, 2015 आणि 2016मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. तर मगील चार वेळा दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेत कमाल करता आलेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)