कॉंग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी वेळोवेळी खोटी आश्‍वासने दिली- शहा

file photo

नवी दिल्ली – कॉंग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी वेळोवेळी खोटी आश्‍वासने दिली. सरकार 5 वर्षांसाठी नसते, सरकार एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. मोदी सरकारने देशाची स्थिती बदलली आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणांमुळे देशाच्या दीर्घकालीन विकासाचा पाया रचला गेल्याचा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

ते म्हणाले की, लोकांच्या सूचनांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजप स्वतःचे घोषणापत्र तयार करणार आहे. हा कार्यक्रम देशाचा सुरक्षित करण्यासाठी, गरिबांचे राहणीमान उंचाविण्यासाठी आहे. हा कार्यक्रम नवा भारत निर्माण करण्यासाठी असल्याचे शाह यांनी सांगितले. जनभागीदारीनेच लोकशाहीला दृढता प्राप्त होते. देशात पहिल्यांदाच एखादा राजकीय पक्ष स्वतःचे संकल्पपत्र निर्माण करण्यासाठी व्यापक स्तरावर जनसंपर्क करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचे आव्हान पंतप्रधान मोदींनी स्वीकारले आहे. राष्ट्रीविरोधी शक्‍तींच्या विरोधात आमच्या सरकारने कठोर पावले उचलली आहेत. देशात शांतता तसेच सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भारत के मन की बात, मोदी के साथ या मोहिमेच्या माध्यमातून भाजप लोकांचे मत जाणून घेत संकल्पपत्र तयार करणार आहे. यात राम जन्मभूमी आणि गंगा सफाई यासारखे अनेक महत्त्वाचे विषय समाविष्ट असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)