वॉशिंग्टन – अमेरिकेतील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता साडेचार लाखांचा टप्पा पार करून पुढे गेली आहे. करोना रोगाचा तेथील प्रसार कमी झाला असला तरी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.
तेथे दररोज तीन हजार लोक करोनामुळे मरण पावतात असे आढळून आले आहे. अमेरिकेपुढील करोनाचे आव्हान अजून संपलेले नाही, पण ती बाब अमेरिकन नागरीक गांभीर्याने घेत नाहीत या बाबत तेथील प्रशासनाने चिंता व्यक्त केली असून सध्या रुग्णांची संख्य कमी होत असले तरी निर्बंध झुगारून लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याच्या ज्या घटना घडत आहेत त्यातून ही रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे असे तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रविवारी तेथे झालेल्या एका फुटबॉल सामन्यांना हजारो लोकांनी गर्दी केली होती. हा प्रकार धक्कादायक आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.