अखिलेश-मायावतींनी राजकारणासाठी नातेवाईकांना फसविले : शिवपालसिंग यादव

लखनौ – प्रगतीशील समाजवादी पक्ष (लोहिया) या पक्षाचे प्रमुख शिवपालसिंग यादव यांनी महागठबंधनवर जोरदार टीका केली आहे. हे गठबंधन नसून ठगबंधन आहे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. तथापि, यांच्यापैकी एकाने आपले पिता आणि काका यांची फसवणूक केली आहे तर दुसऱ्य़ाने आपल्या भावाला ठकविले आहे. अशा लोकांचे हे ठगबंधन आहे, असा दावा त्यांनी केला.

शिवपालसिंह यादव उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे बंधू असून ते अखिलेश यादव यांचे काका आहेत. समाजवादी पक्षात आपल्याला बाजूला फेकण्यात आले असून त्यामुळे आपण नवा पक्ष स्थापन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मायावती आणि अखिलेश यादव यांचा राजकीय इतिहास बेबनावाचा आहे. त्यामुळे या दोन नेत्यांनी युती करून उत्तर प्रदेशातील निवडणुका लढविण्याचे ठरविले तरी जनता त्यांच्या पारड्यात मत टाकणार नाही असा दावा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)