नगर | अत्यंत आशादायी…! नगरमध्ये आज तब्बल 3,388 रूग्णांना डिस्चार्ज; 2,123 नवे करोनाबाधित

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के

नगर – नगर जिल्ह्यात आज खूपच आशादायीचित्र तयार झाले आहे. आज नव्या बाधितांपेक्षा किमान दीडपटीने जास्त रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून, आता ते 86.76 टक्क्यांवर स्थिरावले आहे.

जिल्ह्यात आज 3 हजार 388 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 686 इतकी झाली आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2123 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 22 हजार 390 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 840, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 875 आणि अँटीजेन चाचणीत 408 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 44, अकोले 262, जामखेड 07, कर्जत 85, नगर ग्रामीण 60, नेवासा 20, पारनेर 59, पाथर्डी 69, राहता 02, राहुरी 03, संगमनेर 50, शेवगाव 106, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 46, कँटोन्मेंट बोर्ड 18, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 352, अकोले 04, जामखेड 06, कर्जत 13, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 132, नेवासा 21, पारनेर 23, पाथर्डी 10, राहाता 110, राहुरी 24, संगमनेर 29, शेवगाव 19, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 60, कँटोन्मेंट बोर्ड 15 आणि इतर जिल्हा 19 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 408 जण बाधित आढळुन आले. मनपा 30, अकोले 01, जामखेड 02, कर्जत 03, कोपरगाव 66, नगर ग्रामीण 05, नेवासा 34, पारनेर 52, पाथर्डी 17, राहाता 09, राहुरी 86, संगमनेर 25, शेवगाव 02, श्रीगोंदा 58, श्रीरामपूर 10 आणि इतर जिल्हा 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 892, अकोले 41, जामखेड 153, कर्जत 204, कोपरगाव 131, नगर ग्रामीण 337, नेवासा 140, पारनेर 157, पाथर्डी 98, राहाता 398, राहुरी 151, संगमनेर 121, शेवगाव 206, श्रीगोंदा 112, श्रीरामपूर 111, कॅन्टोन्मेंट 93, इतर जिल्हा 42 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

करोना अपडेट्स
बरे झालेली रुग्ण संख्या:1,60,686
उपचार सुरू असलेले रूग्ण:22390
जिल्ह्यातील एकूण मृत्यू :2128
एकूण रूग्ण संख्या:1,85,204

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.