नगर, दि.21 – नगर जिल्ह्यात करोनाचा आज उद्रेक झाला आहे. आज एकाच दिवसात तब्बल 765 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणार्यांची संख्या साडेतीन हजाराच्या पुढे गेली आहे. तसेच दोघा बाधितांचा करोनाने बळी गेला असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीमध्ये समोर आले आहे.
जिल्ह्यात आज 559 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 79 हजार 894 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 94.44 टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 233, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 416 आणि अँटिजेन चाचणीत 116 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 121, अकोले 1, जामखेड 6, नगर ग्रामीण 11, नेवासे 10, पारनेर 20, पाथर्डी 1, राहाता 6, संगमनेर 17, श्रीगोंदा 25, श्रीरामपूर 12, कॅन्टोन्मेंट 2, इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 95, अकोले 9, जामखेड 4, कर्जत 3, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 15, नेवासे 11, पारनेर 7, पाथर्डी 10, राहाता 79, राहुरी 10, संगमनेर 54, शेवगाव 12, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 26, इतर जिल्हा 19, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 116 जण बाधित आढळून आले. मनपा 34, जामखेड 18, कर्जत 2, नगर ग्रामीण 5, नेवासे 4, पारनेर 9, पाथर्डी 22, राहाता 9, राहुरी 1, शेवगाव 2, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 5 आणि इतर जिल्हा 3, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 229, अकोले 27, जामखेड 24, कर्जत 3, कोपरगाव 50, नगर ग्रामीण 14, नेवासे 15, पारनेर 15, पाथर्डी 8, राहाता 39, राहुरी 14, संगमनेर 55, शेवगाव 21, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 27 , कॅन्टोन्मेंट 8 आणि इतर जिल्हा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.
शहरात 19 कन्टेन्मेंट झोन
शहरात करोनाच्या प्रादुर्भावाचा कहर झाला असून, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वाढत आहेत. त्यामुळे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचा आकडा 19 वर पोहोचला आहे. बालिकाश्रम रोडवरील वसंत विहार बिल्डिंग, शहर गावठाण भागातील नागंरे गल्ली परिसर, सावेडीतील सावली सोसायटी आणि आगरकर मळ्यातील समर्थ कॉलनीमध्ये अशोक जैन ते प्रल्हाद जोशी घर ते गोसावी यांच्या घरापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन सेवा, वाहतुकीला 1 एप्रिलपर्यंत प्रतिबंध राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने नटराज व जैन पितळे होस्टेल येथे करोना केअर स्टेंटर उघडण्यात आले आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या:79894
उपचार सुरू असलेले रुग्ण:3518
मृत्यू:1186
एकूण रुग्णसंख्या:84598
एक लाख 30 हजार जणांना डोस
जिल्ह्यातील कोविड लसीकरणाने वेग घेतला असून, आतापर्यंत एक लाख 34 हजार नागरिकांनी कोविड डोस देण्यात आली आहे. त्यात पोलीस, महसूल, पंचायत राज, अन्य शासकीय कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, 45 ते 60 व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यात एक लाख 12 हजार 260 जणांना पहिला डोस दिला असून, 18 हजार 49 जणांना दुसरा डोस दिला आहे.