मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आमदारही अब्दुल सत्तार यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. सत्तारांवर नाराज असलेले नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण –
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना सुप्रिया सुळे यांच्यावर यांनी टीका केली. राज्यात सत्तांतर झाले तेंव्हापासून विरोधी पक्षाकडून शिंदे यांच्या गटातील आमदारांवर खोके (पैसे) घेतल्याची टीका होत आहे. सुप्रिया सुळे यांनीही यावरून टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर उत्तर देताना सत्तार यांनी सुळे यांना भिकार** म्हंटले. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी होत आहे. राज्याभरात सत्तार यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात येत आहे.
Abdul Sattar apologized: ‘…तर मी माफी मागतो’; सुप्रिया सुळेंवरील अपमानास्पद टीकेनंतर सत्तारांनी मागितली माफी https://t.co/Vq1xQSzLFS
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 7, 2022
दरम्यान, अब्दुल सत्तार याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीपीकांची नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांना चहा पीत नाहीत तर मग दारू पीता का असे वक्तव्य केले होते त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांना कृषीमंत्री हे महत्वाचे खाते दिल्यानंतर मंत्रिमंडळातील इतर नेते नाराज होते.
दरम्यान, सुप्रिया सुळेंवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यभरात पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी नोंद करण्यात येत आहेत. तसेच सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी ही मागणी केली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या घरावर दगडफेक https://t.co/eNK8205l4U
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 7, 2022
सत्तारांनी मागितली माफी –
“मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची मला माहिती आता मिळाली आहे. सुप्रिया सुळे या जेष्ठ नेत्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याकडून तसे काही वक्तव्य झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे शिंदे गटाने प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार? https://t.co/95YKtyWtzC
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 7, 2022