Actor sumedh mudgalkar – ‘राधा कृष्ण’ या टीव्ही मालिकेत कृष्णाची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकणारा अभिनेता सुमेध मुदगलकर याला शुटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. एका प्रोजेक्टच्या ॲक्शन सीनचे शूटिंग करताना सुमेध मुदगलकरच्या नाकाचे हाड मोडले आहे.
सुमेधने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. त्याचे ऑपरेशन झाले असून त्याने प्रकृतीविषयीचे अपडेट सोशल मीडियावर शेअर केले.
सुमेधने चेहऱ्याचा ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केला आहे. यात त्याचा चेहरा दिसतोय. चाहत्यांना सुंपर्ण अपघाताची माहिती देत सुमेधने घाबरण्याची गरज नाही, असे सांगितले. यासोबतच त्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचेही आभार मानले.
सुमेध याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुमेध हा अभिनेता असण्यासोबतच डान्सर देखील आहे. त्याने ‘डान्स इंडिया डान्स सीझन 4’ मध्ये भाग घेतला आहे. ‘राधा कृष्ण’ मालिकेशिवाय ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेतील त्याच्या शुशिमच्या भुमिकेलाही लोकप्रियता मिळाली होती. लवकरच तो ‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटात दिसणार आहे. चाहत्यांनी काळजी करू नये असे त्याने म्हटले आहे.