सर्वांचे हित जपण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध – ए. एस. राजीव

मेगा रिटेल लोन एक्‍स्पोत 100 कोटींचे वाटप

पुणे – ग्राहक आणि उद्योजक या दोघांना एकाच व्यासपीठावर व्यवसाय आणि खरेदीच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. सर्वांचे हित जपण्यासाठी बॅंक नेहमीच कटिबद्ध आहे, असा विश्वास बॅंकेचे व्यवस्थापिक संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी व्यक्त केला.

पुणे शहर, पूर्व व पश्चिम विभाग यांच्या वतीने मेगा रिटेल लोन एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले होते.एक्‍स्पोचे उदघाटन राजीव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, पुणे शहर प्रबंधक व्ही. पी श्रीवास्तव, पुणे पूर्व क्षेत्रीय प्रबंधक वीणा राव, पुणे पश्चिम क्षेत्रीय प्रबंधक प्रशांत दास, शिवांगी राय व पुणे पश्चिम क्षेत्रीय प्रबंधक प्रशांत दास आदी उपस्थित होते.

या एक्‍स्पोमध्ये बांधकाम, ऑटोमोबाईल, सोनेतारण, शिक्षण व विमा क्षेत्रातील सुमारे 25 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुमारे 100 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप तसेच सुमारे 50 कोटी रुपयांचे नवीन कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यात आले. कर्ज मंजूर झालेल्या ग्राहकांना राजीव यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.