8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग कधी येणार याबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आठव्या वेतन आयोगाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 8 वा वेतन आयोग लवकरच येईल, अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन (एआयआरएफ) चे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल अशी आशा आहे. मोदी सरकार जानेवारी 2026 पर्यंत आठवा वेतन आयोग जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
पगारवाढीची अपेक्षा –
शिव गोपाल मिश्रा म्हणाले की, जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल याची मला खात्री आहे. 8 व्या वेतन आयोगाची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नसली तरी सरकार यावर लवकरच काही पावले उचलेल अशी आशा रेल्वे कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत.
8व्या वेतन आयोगाच्या शक्यता –
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वेतन आयोगाच्या शिफारशी दर 10 वर्षांनी लागू केल्या जातात. यापूर्वीचा म्हणजे 7 वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झाली होती. आता 2026 पर्यंत 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा लक्षणीय वाढ होईल अशी आशा आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा –
शिवगोपाल मिश्रा यांच्या या वक्तव्यामुळे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास त्याचा थेट फायदा रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार असल्याचेही स्पष्ट होते. महागाई आणि राहणीमानाचा वाढता खर्च पाहता ही वाढ त्यांच्यासाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
कर्मचारी संघटनांची भूमिका –
ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनसारख्या कर्मचारी संघटना सरकारशी नियमित चर्चा करतात आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडतात. वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आणि शिफारशींबाबत कर्मचारी संघटना सरकारवर दबाव आणत असल्याचे अशा विधानांवरून दिसून येते.
सरकारची भूमिका –
मात्र, सरकारने या मुद्द्यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता ८व्या वेतन आयोगाबाबत सरकार लवकरच काही ठोस पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि महागाई लक्षात घेऊन पगारवाढीची घोषणा करणे हा सरकारसाठी महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.