मुंबई – इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
“इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत. या प्रश्नपेढ्या https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर तयार होतील; तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.” अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी @scertmaha तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत.या प्रश्नपेढ्या https://t.co/Ugilxs0qsF या संकेतस्थळावर तयार होतील; तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks pic.twitter.com/sympWtsgzY
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 15, 2021
दरम्यान, आजपासून डीडी सह्याद्रीवर विषयनिहाय तासिका सुरू झाल्या आहेत. त्यांचे वेळापत्र पुढीलप्रमाणे आहे.
इयत्ता दहावीच्या तासिकांचे वेळापत्रक –
सोमवार – 12:30 ते 1:00
मंगळवार ते शुक्रवार – 12:30 ते 1:00 आणि 1:30 ते 2:00
इयत्ता बारावीच्या तासिकांचे वेळापत्रक –
सोमवार ते शुक्रवार – 2:30 ते 3:30
इयत्ता निहाय व विषय निहाय दैनंदिन वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.