10 टक्‍के आरक्षणाचा सर्वांना लाभ : राम माधव

पाच वर्षांत बेरोजगारी वाढल्याचे आरोप खोटे

नवी दिल्ली – समाजातील एक मोठा वर्ग आरक्षणापासून वंचित होता. आर्थिकदृष्टया मागास सवर्णांसाठी लागू करण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे ही उणीव भरून निघणार आहे. आरक्षणाचा हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिमांनासुद्धा लाभ होणार आहे. बेरोजगारीबाबत विरोधी पक्ष खोटा प्रचार करीत आहेत. तरुणांना आम्ही केवळ आश्वासने दिली नाहीत. तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत असा दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी केला आहे.
बूथ स्तरापर्यंत सक्रिय असलेली पक्षाची संघटना आणि गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने राबवलेल्या 130 पेक्षा जास्त लोककल्याणकारी योजना या त्रिसूत्रीच्या आधारे आम्हाला लोकसभा निवडणुकीत नक्कीच चांगले यश मिळेल, असा विश्वास माधव यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अच्छे दिनच्या घोषणेबाबत राम माधव म्हणाले, मागील पाच वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झालेला आहे. एका मोठ्या वर्गाचे जीवनमान उंचावले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. आंतरिक आणि बाह्य संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा एक देश म्हणून भारताची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे अच्छे दिनची घोषणा हवेत विरली असे म्हणता येणार नाही.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी लोकसभा निवडणुकीपर्यंत या राज्यांमध्ये पक्ष संघटना पुन्हा पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागलेली असेल. नवे सरकार आल्यानंतर एक महिन्यातच या राज्यांमध्ये बेबंदशाही निर्माण होण्यास सुरुवात झाल्याची टीकाही माधव यांनी केली.

मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपमधील सामूहिक नेतृत्वाची परंपरा संपल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. याबाबत राम माधव म्हणाले, भाजपमधील सामूहिक नेतृत्व संपले, असे म्हणणे चुकीचे आहे. दर तीन महिन्याला राष्ट्रीय अधिवेशन अथवा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. सामूहिक नेतृत्वाच्या सिद्धांताचे पूर्ण पालन केवळ भाजपच करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)