पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित सरपंच महिलेला मारहाण

दावडी : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. यावेळी जनतेतून सरपंच निवड नसल्यामुळे अनेकठिकाणी सरपंचपदासाठी घोडेबाजार झाल्याचे पाहायला मिळाले. यातून अनेक ठिकाणी वाद झाले. पुणे जिल्ह्यातील मोहकल येथे पराभूत उमेदवाराने नवनिर्वाचित सरपंच महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबाला घरात घुसुन बेदम मारहाण झाली. खेड तालुक्यातील मोहकल गावातील ही घटना आहे. आश्विनी मारुती भागवत असे मारहाण झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.