पुणे – पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विधीनिती प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. शिवाजीनगर न्यायालायत हा सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सचिन थोपटे, उपाध्यक्ष-ऍड. गौरव वाळुंज, सचिव- ऍड. निखील बोडके, महिला सचिव-ऍड. प्रियांका सुरवसे, हिशोबनिस- ऍड. गोरख मकासरे, सदस्य- ऍड. मंगेश खराबे, सदस्य- ऍड. महेश मासुळकर, सदस्य- ऍड. सारिका मोरे, सदस्य- ऍड. नेहा कांबळे, सदस्य- ऍड. ऐश्वर्या शिरसाट या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
विधीनिती प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी ऍड. थोरवे यांनी, पुणे जिल्ह्यातील द्वितीय क्रमांकाची पिंपरी चिंचवड बार असोसिएशन असा नाव लौकीक आहे, असे म्हटले. तसेच, ही कमिटी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. त्यामध्ये लेक्चर सीरिज आयोजन त्याच बरोबर न्यायाधीश सत्कार समारंभ, संविधान दिननिमित्त कार्यक्रम अशा उपक्रमांचा समावेश आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड. प्रमोद नढे यांनी केले.
याप्रसंगी सत्कार स्वीकारताना पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन अध्यक्ष सचिन थोपटे यांनी वर्षभर विविध उपक्रम राबविणार आहे. यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच विधीनिती प्रतिष्ठान आणि थोरवे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.