पुणे – प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पदी निवड झालेल्या नवनिर्वाचित न्यायाधीशांचा सत्कार पुणे बार असोसिएशनतर्फे करण्यात आला. याच कार्यक्रमात अन्य सत्कारही करण्यात आले. लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. प्रताप परदेशी यांचा सन्मान करण्यात आला.
2020 मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परीक्षेत 77 पैकी 55 उमेदवार आणि आतापर्यंत 500 हून अधिक न्यायाधीश होण्यास मार्गदर्शन करणाऱ्या ऍड. गणेश शिरसाट आणि वारजे पुलावर अपघातग्रस्त 8 वर्षाच्या चिमुकलीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोहोचविणाऱ्या पोलीस नाईक समीर बागसीराज व पोलीस निरीक्षक बापू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
मैथिली मर्ढेकर, स्नेहा देशपांडे, मंजुश्री चव्हाण, इशा घाटे, सायली लंबाते, रवी काळे, अमोल भोसेकर, शुभदा सुक्रे, शहनवाज पठाण, कृष्णा लटके, प्रियंका शिंदे, हनी पटेल, महेश भडक, माधुरी चौधरी, नम्रता शितोळे, ओंकार शास्त्री आदी नवनिर्वाचित न्यायाधीशांचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, ऍड. लक्ष्मण येळेपाटील, सचिव ऍड. अमोल शितोळे, ऍड. सुरेखा भोसले, हिशेब तपासणीस- ऍड. शिल्पा कदम, कार्यकारिणी सदस्य ऍड.अर्चिता जोशी, ऍड. रितेश पाटील ऍड. तेजस दंडगव्हाळ, ऍड. कुणाल अहिर, ऍड. अमोल दुरकर, ऍड. मजहर मुजावर, ऍड. अमोल भोरडे, ऍड. सई देशमुख, ऍड. काजल कवडे उपस्थित होते.