पुणे : नव्याने 36 रुग्णालये डॅशबोर्डवर

366 बेड वाढले : आता 80 टक्‍के बेड ताब्यात घेणार


महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांची माहिती

पुणे – नव्याने 36 रुग्णालये डॅशबोर्डवर आले असून, सुमारे 366 बेडची वाढ झाली आहे. या बेडचा समावेश करून आता महापालिकेकडे तब्बल 7 हजार 146 बेड नियंत्रणाखाली आणण्यात आले आहेत. ज्यांनी 80 टक्‍के बेड ताब्यात दिले नाहीत त्यांचे आता घेण्याला सुरुवात केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

महापालिकेने आजपर्यंत खासगी रुग्णालयांना 80 टक्‍के बेड ताब्यात देण्यासंदर्भात सूचना केली जात होती. मात्र, अनेक रुग्णालयांनी बेड ताब्यात दिले नाहीत. आता हे बेड ताब्यात घेण्याला सुरुवात केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी सांगितले.

महापालिकेने आता जवळपास 7 हजार 146 बेड महापालिकेच्या ताब्यात असून, ऑक्‍सिजनशिवाय असलेले 1,452 बेड, ऑक्‍सिजन बेड 4,733, व्हेंटिलेटरशिवाय आयसीयु 412, व्हेंटिलेटर बेड 549 उपलब्ध झाले आहेत. यामध्ये अनुक्रमे 285, 433, 5 बेड शिल्लक असून, व्हेंटिलेटर बेडचा आजही तुटवडा असून ते शिल्लकच नसल्याचे दिसून येत आहे. काही रुग्णालयांना नव्याने डॅशबोर्डमध्ये समाविष्ट केले असून, त्यातून सुमारे 366 बेड वाढले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.