नेवासा : नगरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील अनधिकृत वाहतूक,नादुरुस्त महामार्ग ग्रामीण रस्ते आणि सुविधांचा अभाव याबाबत सतत आंदोलने करून आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पोटे यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
तसेच या समितीचे स्थायी सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी,जी प, आयुक्त महानगरपालिका, उपवनसंरक्षण, जिल्हा शल्य चिकित्सक,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर,प्रकल्प संचालक राष्ट्रीय मार्ग,प्राधिकरण कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे, विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नगर पोलीस निरीक्षक शहर वाहतूक अहिल्यानगर, पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस अहिल्यानगर, कार्यकारी अभियंता सा.बा विभाग अहिल्यानगर, सा.बा विभाग संगमनेर, जागतिक बँक प्रकल्प विभाग अहिल्यानगर रोहयो कार्य विभाग अहिल्यानगर, शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा नियोजन अधिकारी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक, डी आय ओ एन आय सी अहिल्यानगर, रेजीलंट इंडिया मुंबई हे सर्व समिती सदस्य बैठकीला उपस्थित होते.
अभिजीत पोटे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृतपणे फोडलेल्या डीवाईडर मुळे अनेक अपघात होत असल्याचे रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या लक्षात आणून देताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित टास्क फोर्स करून आठ दिवसात कारवाई करा. डिव्हायडर फोडणाऱ्या पेट्रोल पंप,हॉटेल व इतर व्यावसायिकांना तातडीने नोटीस पाठवण्याचे आदेश दिले.
मेनरोड मुख्य महामार्गाला जोडलेल्या छोट्या रस्त्यांच्या सुरुवातीला स्पीड ब्रेकर करावेत. जेणेकरून मुख्य रस्त्यावर किंवा अचानक येणार नाहीत त्यामुळे अपघात टळतील. नागरिक सुरक्षित राहतील अशी सूचना अभिजीत पोटे यांनी केली. पुणे रोड चास, गुहा, भिंगार कॅम्प निंबोडी जवळ सतत अपघात होत आहेत. यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे अपघात झाल्यावर पोलीस आरटीओ एकाच वेळेस घटनास्थळावर जात नाहीत.
पोलीस आणि आरटीओ यांच्यामध्ये समन्वय नाही संभाजीनगर – अहिल्यानगर महामार्गावर नेवासा फाटा येथे असणाऱ्या त्रिमूर्ती कॉलेजसमोर फुट ब्रिज उभारण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी फुट ब्रिज तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला येणाऱ्या बजेटला पाठवण्याच्या सूचना केल्या स्पीड चेक करणारी वाहने रस्त्यावर दिसत नाहीत.
इमामपूर घाट पांढरी फुल परिसरात महामार्गाने जाणारी नागरिक चहा-पाणी व भेळ भत्ता खाण्यासाठी रोड हद्दीतच अतिक्रमित जागेत सुरू असणाऱ्या दुकानांसमोरच वाहने लावून रस्त्यास मोठा अडथळा निर्माण करून अनेक अपघात होत असल्याचे सांगितले असता जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी नो पार्किंग झोन करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना यावेळी झालेल्या बैठकीत दिल्या.
राहुरी शहर व साखर कारखाना परिसरात रॉंग साईडने वाहने चालवली जातात. या परिसरात सतत वाहतूक कोंडी व अपघात होत असल्याचे अभिजीत पोटे यांनी समितीच्या लक्षात आणून दिले. नेवासा फाटा राजमुद्रा चौक येथे असणारा एसटी थांबा पुढे सरकविण्यात यावा. एसटी बस रस्त्यावरच उभी राहत असल्याने प्रवाशांची त्या ठिकाणी गर्दी होऊन तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात आणून दिले. यावर जिल्हाधिकारी यांनी विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना एसटी स्थानकाबाबत सूचना केल्या.
खडकाफाटा टोल नाका टोल वसुली दररोज सुरू आहे. रस्त्याला जागोजागी टीम मिळाली आहेत डिव्हायडर फुटले आहेत. रोड फर्निचर कुठेही दिसत नाही. टोलनाक्यालगत स्त्री व पुरुषांसाठी प्रसाधन गृह नसून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हीच अवस्था सुपा टोल नाका येथे देखील आहे. या टूल कंपन्यां विरोधात अभिजीत पोटे यांनी अनेक आंदोलने करून आजपर्यंत रस्ता दुरुस्त करून घेतल्याचे लक्षात आणून दिले असता जिल्हाधिकारी यांनी रस्त्याची दुरुस्ती डागडुजी करून दोन्ही टोलनाक्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून स्त्री-पुरुषांसाठी प्रसाधनगृह तातडीने निर्मिती करण्याचे आदेश दिले.
अभिजीत पोटे यांनी संभाजीनगर ते अहिल्यानगर हा प्रमुख दिंडी महामार्ग असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा योग्य वाढलेल्या उंचीची झाडे लावावीत जेणेकरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना सावली मिळेल यावर जिल्हाधिकारी यांनी झाडे लावण्याच्या सूचना केल्या. माध्यमिक शाळा महाविद्यालयामध्ये अल्पवयीन मुले दुचाकी चार चाकी सारखी वाहने घेऊन येतात. अलीकडेच झालेल्या दहावी आणि बारावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी थार,फॉर्च्यूनर सारखी मोठी चारचाकी वाहने विद्यालयात आणली यातून मोठे अपघात घडू शकतात.
ही बाबा अभिजीत पोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मदतीने सशक्त निरोगी आणि सुरक्षित पिढी घडवण्यासाठी प्रत्येक शाळेतल्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मदतीने शाळेत होणाऱ्या पालक सभेतल्या समुपदेशनाने हे शक्य आहे तसेच शाळेच्या गेटच्या आत विद्यार्थ्यांनी आणलेल्या वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी अभिजीत पोटे यांनी करतात जिल्हाधिकाऱ्यांनी किशोरवयीन मुलांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची निदर्शनात येत आहे.
याबाबत जनजागृती करण्याच्या आदेश बैठकीत दिले शाळांमधून पालकांना सूचना देणे शाळांनाही आवश्यक त्या सूचना देण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. दुचाकीवरून येणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईची टांगती तलवार असेल असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पोटे यांनी प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ इन्स्पेक्टर बोगस धोकादायक ऊस वाहतूक करणारी वाहने तसेच ओव्हरलोडींग वाहनावर फिटनेस पासिंग कर विमा थकवणारी वाहने रस्त्यावर राजरोस सुरू असून मद्यपान करून वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर चालवली जातात कारवाई करत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले जिल्हाधिकारी यांनी उपप्रादेशिक अधिकारी यांना कडक कारवाई करण्याच्या आदेश दिले.
यावर अभिजीत पोटे यांनी सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी आपल्या कर्तव्यात हयगय करत आहेत. सर्व कामे नियमात व शिस्तीचे पालन करण्यासाठी फक्त “कठोर शिक्षा” हाच उपाय असल्याचे सांगितले. या बैठकीला अभिजीत दादा पोटे प्रतिष्ठानचे संजय वाघ, मेजर महादेव आव्हाड, देविदास मनाळ, नानासाहेब पवार, रमेश भालके,दीपक पटारे, नानासाहेब तागड, सोमनाथ गर्जे, रामभाऊ राव, शिवाजीराव आगळे,दीपक सोलट या सर्व अभिजीत दादा पोटे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रश्नावर आवाज उठवला.