Newasa News : हृदयद्रावक! भालगाव येथे पाण्यात पडून दोघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
Newasa News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भालगाव परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.

Newasa News : भालगाव येथे पाण्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली आहे. मंगळवारी दुपारी गोदावरी नदीत या दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आले. या घटनेने संपूर्ण भालगाव परिसरात शोककळा पसरली आहे. (Newasa News)
भास्कर देवराव तनपुरे (वय 50) व सार्थक गणेश निमसे (वय 16, दोघेही रा. भालगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Newasa News)
या घटनेची माहिती मिळताच शिवशंभो अॅम्बुलन्स सर्विसचे चालक अनिल मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. (Newasa News)
या दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले या घटनेचा पुढील तपास सुरु असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भालगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. (Newasa News)





