Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढेंच्या ‘या’ कारवाईवरून मोठा वाद; 600 शेतकरी, 5 हजार ग्राहक आक्रमक
Tukaram Mundhe Action : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून या मोहिमेला पाठिंबा मिळत असतानाच गोरस भंडारवरील कारवाईविरोधात स्थानिक पातळीवर असंतोष वाढू लागला आहे.

Tukaram Mundhe Action : राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाईची मोहीम राबविणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईवरून वर्ध्यात नवा वाद निर्माण झाला आहे. एफडीएने वर्ध्यातील गोरस भंडार या दुग्धप्रक्रिया संस्थेचे उत्पादन व विक्री केंद्र सील केल्याने गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले असून, त्याचा फटका शेकडो दूध उत्पादक शेतकरी, वितरक, कर्मचारी आणि हजारो ग्राहकांना बसत असल्याचे म्हंटले आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून या मोहिमेला पाठिंबा मिळत असतानाच गोरस भंडारवरील कारवाईविरोधात स्थानिक पातळीवर असंतोष वाढू लागला आहे. (Tukaram Mundhe Action )
कारवाईनंतर संस्थेचे दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. दररोज सुमारे नऊ हजार लिटर दूध खरेदी करणाऱ्या या संस्थेचे व्यवहार थांबल्याने सुमारे 600 दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. दूध विक्रीचा प्रमुख आधार बंद झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्राहकांनी राज्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे. तसेच गोरस भंडारचे उत्पादन तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी पाच हजारांहून अधिक ग्राहक आणि सुमारे 600 शेतकरी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना सामूहिक निवेदन पाठविणार आहेत. (Tukaram Mundhe Action )
मूक मोर्चानंतर आंदोलनाची तीव्रता वाढणार – (Tukaram Mundhe Action )
गोरस भंडार बंद असल्याने नियमित आणि शुद्ध दूध उपलब्ध होत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. या प्रश्नावर शुक्रवारी शेतकरी आणि ग्राहकांनी संयुक्तपणे मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला. मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू असून, हा प्रश्न मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
25 लाखांचा माल जप्त – (Tukaram Mundhe Action )
एफडीएने गोरस भंडारमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन असुरक्षित वातावरणात होत असल्याचा ठपका ठेवत उत्पादन व विक्री पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईदरम्यान सुमारे 25 लाख रुपयांचा तयार माल आणि उत्पादन साठा जप्त करण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकरी, वितरक आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम –
वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था अर्थात गोरस भंडार ही गांधीवादी विचारसरणीवर आधारित सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते. विविध गावांतील सुमारे 85 गोपालक संस्थेला दूध पुरवतात, तर 250 हून अधिक वितरक घरपोच दूध वितरणाचे काम करतात. वर्धा शहरासह परिसरातील हजारो कुटुंबांच्या दूधपुरवठ्यात या संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. (Tukaram Mundhe Action )
संस्थेच्या विविध केंद्रांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत असून, ‘गोरस पाक’सह अन्य दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे संस्थेचे उत्पादन बंद राहिल्यास रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्राहकांचा पुरवठा या तिन्ही पातळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एफडीएची कारवाई आणि स्थानिकांच्या मागण्या यामुळे हा प्रश्न आता केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न राहता वर्धा जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिक चर्चेचा विषय ठरला आहे.




