#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

लंडन( साऊदॅम्प्टन) : बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर बांगलादेशचा संघ स्पर्धेतील आपला विजयरथ राखण्यासाठी उत्सुक झाला आहे. त्यांच्यासमोर आजच्या सामन्यात न्यूझीलंडचे कडवे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवायाचा असल्यास बांगलादेशच्या संघातील शाकिब अल हसनला उत्कृष्ट कामगिरी करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे आपल्या पहिल्या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने श्रीलंकेवर दहा गडी राखून मात करत आपल्या आभियानाची विजयी सुरूवात केली आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडने जिंकला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

बांग्लादेश संघ –

तमीम इक़बाल, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुशफ़िकुर रहीम, मोहम्मद मिथुन, महमूदुल्लाह, मोसद्दक हुसैन, मेहंदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मशरफे मोर्तज़ा, मुस्तफ़िज़ुर रहमान

न्यूझीलंड संघ –

मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.