वेलिंग्टन – आयपीएलचे आयोजन करण्याबाबत आता श्रीलंका व अमिरातीबरोबरच न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही बीसीसीआयला प्रस्ताव दिला आहे. याबाबत बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नसला तरीही असा प्रस्ताव आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
करोनाचा धोका कायम असतानाही श्रीलंका, अमिराती आणि आता न्यूझीलंड या देशात हा धोका अन्य देशांइतका नसल्याने येथे आयपीएलचे आयोजन होऊ शकते. हा प्रस्ताव बीसीसीआयला मिळालेला आहे. मात्र, अद्याप ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत आयसीसीने कोणताही निर्णय जाहीर केलेला नसल्याने बीसीसीआयलाही आयपीएलबाबत निर्णय घेता येत नसल्याने या प्रस्तावावर अद्याप चर्चा झालेली नाही. ही स्पर्धा रद्द झाली तरच त्या विंडोमध्ये आयपीएलचे आयोजन करता येणार असून जर यंदाची स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआयला जवळपास 5 हशार कोटी रुपयांचा तोटा होण्याची भीती आहे.