वेलिंग्टन – न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी ख्रिस हिपकिन्स यांचा आज शपथविधी झाला. 44 वर्षीय हिपकिन्स हे न्यूझीलंडचे 41 वे पंतप्रधान आहेत. जेसिंडा आर्डन यांच्या राजीनाम्यानंतर हिपकिन्स यांची लेबर पार्टीच्या नेतेपदी निवड झाली होती. आज जेसिंडा आर्डन यांच्याकडून हिपकिन्स यांनी पंतप्रधानपदाची औपचारिक सूत्रे हाती घेतली. त्यानंतर आर्डन यांनी आपल्याकडील काळजीवाहू पंतप्रधानपदाची जबाबदारी सोडली आणि संसदेचा निरोप घेतला.
पंतप्रधान म्हणून हिपकिन्स आणि उपपंतप्रधान म्हणून कॅर्मेल सेपुलोनी यांचा संसदेत शपथविधी झाला. त्यानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात हिपकिन्स यांनी करोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्याला आपले प्राधान्य असेल, असे सांगितले.
हिपकिन्स हे 2008 मध्ये संसदेत सर्वप्रथम निवडून आले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये करोनावाषयक व्यवहारांचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस, शिक्षण आणि सामाजिक सेवांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
Republic Day 2023 : प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी 9.15 वाजता होणार शासकीय ध्वजारोहण
साडेपाच वर्षे प्रभावी काम केलेल्या जेसिंडा आर्डन यांनी अचानक राजीनामा दिल्याने लेबर पार्टीला नव्या नेत्याची निवड करावी लागली.