#CWC19 : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंड 4 बाद 48

बर्मिंगहॅम – दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना न्यूझीलंडविरूद्ध आज येथे होणाऱ्या लढतीत विजय अनिवार्य आहे. आतापर्यंत एकही सामना न गमविणाऱ्या न्यूझीलंडलादेखील बाद फेरीतील स्थान बळकट होण्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे.

सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस झाल्याने मैदान ओले झाल्याने टाॅस आणि सामना सुरू होण्यास विलंब झाला. सध्या न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

सामना सुरू झाला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंडच्या 12.3 षटकांत 4 बाद 46 धावा झालेल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर केन विलियमसन 23 धावांवर खेळत आहे. सलामीवीर मार्टिन गप्टिल 5, काॅलिन मुनरो 12, राॅस टेलर 3 आणि टाॅम लाथम 1 धावांवर बाद होऊन माघारी परतले आहेत.

न्यूझीलंड संघ –

मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

पाकिस्तान संघ –

इमाम-उल-हक, फ़ख़र ज़मान, बाबर आज़म, मोहम्मद हफीज़, हारिस सोहैल, सरफ़राज़ अहमद, इमाद वसीम, शादाब ख़ान, वहाब रियाज, मोहम्मद आमिर, शाहीन अफ़रीदी

Leave A Reply

Your email address will not be published.